प्रतिनिधी, जळगाव : रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती लहुजी संघर्ष सेना यांच्यावतीने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माण्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवुन त्यांच्या जिवनावर विचार व्यक्त करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील, माजी नगराध्यक्ष दारामोहम्मद जफर, माजी नगरसेवक जगदीश घेटे, वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष बाळू शिरतुरे, पंकज वाघ, डी.डी वाणी, संतोष पाटील , शहर अध्यक्ष कॉंग्रेस
सावन मेढे, धुमाभाऊ तायडे, संघरत्न दामोदरें , राजेंद्र अटकाळे यांचा सह आदी माण्यवर उपस्थित होते.
