जनतेज न्युज

संजय राऊत यांना ईडीने अटककेल्यानंतर संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक

प्रतिनिधी, अहमदनगर : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार हे ईडीची दहशत दाखवत असल्याचा आरोप संगमनेर शिवसैनिकांकडून करन्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना रात्री उशिरा ईडीने अटक केली. संगमनेर शहरात शिवसेना अहमदनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात संगमनेरमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी संगमनेरमध्ये शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट केले जात आहे व शिवसेना संपवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा मोठा डाव आहे. भाजप प्रेमी राज्यातील वातावरण खराब करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. राज्यातील वातावरण अतिशय भयानक आहे. देशात दडपशाही हुकूमशाही प्रवृत्ती डोकं वर काढत आहे असा घनघात आरोप आंदोलकांकडुन करण्यात आला आहे.