जनतेज न्युज

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाल्याने जळगाव मध्ये भाजप ने केला आनंद उत्सव साजरा

जळगाव :-राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी नुकताच मंजूर केला. त्यामुळे शुक्रवारी दुपारी जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासन तसेच संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्यपालांनी हा राजीनामा नुकताच मंजूर केला आहे. त्यामुळे जळगावात भाजपच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.