जनतेज न्युज

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने मुखेड मध्ये चक्काजाम आंदोलन

प्रतिनिधी , नांदेड : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनावर सरकार कडून केली जात असलेल्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी तसेच तीन कृषी कायदे रद्द करून, आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत देशभर रास्तारोको करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आज नांदेड जिल्ह्यातील  मुखेड येथील संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर चक्काजाम आंदोलन करून मोदी सरकार व केंद्र सरकाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कृषी कायदे मागे घ्यावे अशी मागणी आंदोलन कर्त्याकडून करण्यात आली. तसेच पत्रकारावर होत असलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या आंदोलनामुळे मुखेड शहरातील नर्सी व मुखेड हा प्रमुख मार्ग तब्बल १ तास अडवून धरल्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती.