जनतेज न्युज

अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन..

प्रतिनिधी , जालना : आज जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सुमारे अर्धा तास रस्ता रोको करण्यात आला. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेवाळे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आला यावेळी पोलिस स्टेशनचे ए पी आय घोडके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक मुटकुळे, निवृत्ती सानप,गजानन सानप,बालाजी शिखरे, राजीव शेवाळे,प्रल्हाद जायभाये,संजू शेवाळे,रामेश्वर काफरे, मदन सानप,वाल्मिक हळदे,वाल्मिक शेवाळे, रामेश्वर घुगे आदींची उपस्थिती होती.