जनतेज न्युज

सकल धनगर समाज पुणे शहराच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान

प्रतिनिधी , पुणे : सकल धनगर समाज पुणे शहराच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले . हडपसरमधील उन्नतीनगर येथील अक्षय ब्लड बँक येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष अनिलअप्पा धायगुडे यांच्याहस्ते करण्यात आले . या शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले . यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला .
या शिबिराला अक्षय ब्लड बँकेचे डॉ विजय पाटील , अश्विनी सूर्यवंशी , संतोष चिंचकर , सागर लोहकरे , प्रशांत शिगवण , अमीर पठाण आदींनी सहकार्य केले . याप्रसंगी शिबीर यशस्वी करण्यासाठी शिबिराचे आयोजक धनंजय धुळगुंडे , विद्या तामखेडे , बालाजी सोलंकर , नागनाथ सोडगीर , सतीश शेंडगे , माउली मलकापुरे , पराग बरकडे , महादेव वाघमोडे , बाबाराजे कोळेकर , राम धुळगुंडे , प्रशांत धुळगुंडे , रामदास चिंतले , इस्माईल शेबाई , तुकाराम माने व रमेश शिंगरे आदींनी परिश्रम घेतले .