जनतेज न्युज

सख्ख्या भावांनी बहिणीला केली जबर मारहाण, पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू

प्रथिनिधी, नवी मुंबई : उलवे मध्ये एक 25 वर्षीय तरुणी मागील 8 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश वरून येऊन राहत होती,एका खाजगी ठिकाणी काम करत होती. 26 तारखेला तिच्या गावावरून तिचे दोन सख्खे भाऊ सलमान खान आणि शाहरुख खान हे तिला भेटायला आले. मात्र, तिचा मित्र असलेल्या अनोजी अमंत याला तिचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तो तिला तिच्या रूमवर भेटायला गेला असता ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांना सदर घटनेची माहिती देता, त्यांनी काही माहितीच्या आधारे तिच्या दोन्ही भावांना उत्तर प्रदेश मधून ताब्यात घेतले आहे. या उभयतांनी गुन्ह्याची कबुली देताना, ती तोकडे कपडे परिधान करून सोशल मीडियावर टाकत होती आणि तिचे एका मुला बरोबर प्रेम होते, यामुळे तिला मारल्याचे सांगितले. आता ती रुग्णालयात आयसीयूत असून मृत्यूशी झुंज देत आहे.