प्रतिनिधी, बुलडाणा : संपूर्ण राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून धार्मिकतेच्या विषयावर रणकंदन माजले आहे. आणि यामुळे शेतकर्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोलताना दिसत नाही. यातच बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील भयावह परिस्थिती दाखवत सरकारसोबत सर्वच राजकीय नेत्यांना याचना केली आहे. या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.
खामगाव तालुक्यातील आसा – दुधा येथील सुनील पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या शेतात टरबुजाची लागवड केली होती, मात्र टरबुजाला भाव नसल्याने, त्यांचे अतोनात नुकसान होत आहे, तर दुसरीकडे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अक्षरशः हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या टरबुजांला त्यांच्या डोळ्यासमोर सडतांना पहावे लागत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने सरकार मायबाप शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
