जनतेज न्युज

सांगली जिल्हा निवारा बांधकाम संघटनेच्या वतीने महापालिकेवर आंदोलन

प्रतिनिधी , सांगली : सन १९९४ पासून सांगलीतल्या बेघरांना व झोपडपट्टी धारकांना घरे मिळवून द्यावी, अशी मागणी झोपडपट्टी धारकांनी केली होती. पण अद्याप या लोकांना घरे मिळालेली नाहीत. फक्त आश्वासने द्यायचे काम हे महापालिका प्रशासनाने केल्याने आज सांगली जिल्हा निवारा बांधकाम संघटनेच्या वतीने सांगली महापालिकेवर आंदोलन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर या लोकांना स्वतःची हक्काची घरे मिळणार नाहीत तो पर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार असे आंदोलनावेळी सांगण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.