प्रतिनिधी , सांगली: सांगलीच्या राम मंदिर ते सिव्हील चौक दरम्यान दलित महासंघच्य वतीने रस्ता दुरूस्ती आणि डाबरी करणासाठी प्रतिकात्मक झोपेचं सोंग आंदोलन करण्यात आले… यावेळी खराब रस्त्यावर झोपून हे आंदोलन करण्यात आले.. राज्यकर्ते आणि महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.. या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत.. त्याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख सिव्हिल हॉस्पिटल आहे.. या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब येत असतात.. आणि याच रस्त्याची चाळण झाली आहे.. रस्ता लवकरात लवकर करावा अन्यथा आणखी तिर्व आंदोलन करण्यात येईल.. असा इशारा दलित महासंघ तर्फे देण्यात आला…
