प्रतिनिधी , सांगली: केंद्राला मराठा आरक्षणाला परवानगी द्यायची नसेल तर त्यांनी राज्याला स्वायत्तता द्यावी..देवेंद्र फडणवीसांनी केवळ भूलथापा देऊन फसवणूक केली…श्रीमंत कोकाटे.
मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची आहे… आणि आरक्षण मर्यादा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढवली पाहिजे.. केंद्राला मराठा आरक्षणाला परवानगी द्यायची नसेल तर त्यांनी राज्याला स्वायत्तता द्यावी.. देवेंद्र फडणवीसांनी जो गायकवाड आयोग नेमला होता ते आयोग बेकायदेशीर होतं… इतर समाजातील आरक्षण धक्का न लावता केंद्राने मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.. देवेंद्र फडणवीसांनी केवळ भूलथापा देऊन फसवणूक केली आहे… असे वक्तव्य श्रीमंत कोकाटे यांनी केले…ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते..
ज्या साखर साम्राटांचा पदविधरांशी काही संबंध नाही अशांना भाजप आणि राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे… या दोन उमेदवारांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची फसवणूक केली… ज्यांना पदविधरांचे प्रश्न माहीत नाहीत ते काय मत मांडणार : खुद्द अजित पवारांचा जुन्या पेन्शन ला विरोध आहे आणि पदवीधर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी जुनी पेंशन आहे.. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पदवीधरांचे प्रश्न सोडू शकत नाहीत. दोन साखर सम्राटांनी सर्वांना लुटलं आशा साखर साम्राटांना या निवडणुकीत पराभव करा.
