प्रतिनिधी , सांगली : सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने घरफोडी करणारी टोळी जेरबंद केली आहे . या टोळीकडून दहा गुन्हे उघडकीस आले आहेत . या टोळीकडून तीन लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत . अतिरेकी उर्फ आकाश श्रीकांत खांडेकर वय 22 , रा . राणाप्रताप चौक सांगलीवाडी , अक्षय धनंजय पोतदार वय 20 रा . पाण्याच्या टाकीजवळ मालगाव रोड सुभाषनगर मिरज , विजय संजय पोतदार वय 23 , रामकृष्णनगर इगल लाईट हाऊसजवळ कुपवाड आणि रोहित गणेश कोळी वय 20 रा . हरीपूर रोड विनायक पार्क , साईमंदिराजवळ सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत .
या चारही आरोपींनी गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत या दहा घरफोड्या केल्या आहेत . यामध्ये सोन्याचे दागिने , चांदीचे दागिने , मोबाईल , तसेच भांडी व रग्नोख रक्कम याची चोरी केली आहे . त्याच्याकडून तीन लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीराज फडणीस , व त्यांच्या पथकाने केली आहे .
