प्रतिनिधी , जालना : आम्ही EWS च्या मागणीसाठी मराठा समाजासोबत ताकदीनिशी उभे राहू.मात्र ओबीसीतुन आरक्षणाची मागणी करणे चुकीचे असून आम्ही न्यायातुन बाजूला सारणार नाही वेळप्रसंगी मंत्रिपद गेलं तरी चालेल असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ओबीसींच्या साथीमुळे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं असंही ते म्हणाले.औरंगाबाद मधील मेळाव्यात गैरसमजुतीतुन वाद झाला असूनतो मिटला आहे.राज्यातील सर्व जातींना एकत्र करताना थोडा समन्वयाचा अभाव असणारच आहे.मि मंत्री जरी असलो तरी मंत्रिपद हे औट घटकेसाठी आहे.मला ओबीसींच्या हक्कासाठी लढावं लागेल असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत मिळालेला कौल म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात केलेल्या चांगल्या कामांवर मतदारांनी शिक्का मारला आहे असंही वडेट्टीवार यांनी सांगत आरएसएस चा 58 वर्षाचा गड आम्ही उध्वस्त केला असंही ते म्हनाले.
