प्रतिनिधी , डोंबिवली : आरोपींच्या विरोधात चार्ज सीट लवकर दाखल करा,
त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाची आणि वडिलांच्या रोजगाराची व्यवस्था करा, पोलिसांना केल्या सूचना,,,,
,डोंबिवलीतील तरुणावरील सामूहिक बलात्कार प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज पोलिस अधिकारी आणि पिडीत तरुणी आणि तिच्या आई वडिलांची भेट घेतली आहे. तिच्या कुटुंबियांना मदत केली आहे. मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता येईल. इतकेच नाही तर मुलीच्या वडिलांच्या रोजगारा संदर्भात कशी मदत करावी यासंदर्भात सूचना पोलिस अधिकार्यांना गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. तर दुसरीकडे पोलिसांना आरोपीच्या विरोधात चार्ज शिट लवकर दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहे. तर दुसरीकडे नामांकित पीपीना जय मिळत नसल्याने न्यायालयांमध्ये काही केसेस प्रलंबित राहत असून या प्रकरणी ज्यांचे कन्वेशन रेट चांगला आहे. त्याच बरोबर ज्यांना वेळ देता येईल अशा पीपी कड़े हा विषय घेण्यात यावा अशी मागणी ही या वेळेस करण्यात आली आहे.
