जनतेज न्युज

सायकल चालवा आणि आणि निरोगी रहा….

प्रतिनिधि , बारामती : सायकल चालवा आणि आणि निरोगी रहा हा संदेश देण्यासाठी पारंपारिक नऊवारी साडी नेसून बारामतीच्या 15 महिलांनी बारामती ते पंढरपूर असा 120 किलोमीटरचा प्रवास केलाय. संपूर्ण जगावर करोना महामारी जीवघेणा संकट आहे. या संकटापासून दूर राहण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती चांगली असावी. आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शारीरिक व्यायाम हेच मोठं शस्त्र आहे. व्यायामामध्ये सायकलिंग करणे सोपा व्यायाम आहे . यामुळे प्रदूषण देखील होत नाही. हाच संदेश घेऊन बारामती सायकल क्लब च्या पंधरा महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसून 120 किलोमीटरचा प्रवास केलाय. पारंपरिक वेषात आलेल्या या सायकलपटू महिलांचे पंढरपूर मध्ये हळदी- कुंकू आणि विठ्ठलाची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. या महिलांच्या ग्रुपने यापूर्वी बारामती ते आळंदी हा 120 किलोमीटरचा प्रवास केलाय. आज बारामती ते पंढरपूर हा प्रवास केलाय . यातून कोणत्याही महामारी सामना करायचा असेल तर आपली शारीरिक संपत्ती वाढवणे गरजेचे आहे तसेच सायकल चालवल्याने प्रदूषण कमी होण्यास हातभार लागतो हाच संदेश दिलाय .