जनतेज न्युज

सोलापुर तिळगुळ भरवुन घालवली ग्रामपंचायत निवडणुकीची कटुता

प्रतिनिधी , सोलापुर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे भावकीचे भांडणच म्हणले तर वावगे ठरणार नाही. अंत्यत निकराचा संघर्ष या निवडणुकीत केला जातो. भावा विरुद्ध भाऊ अशी लढाई होते . वर्षानुवर्षे एकमेकांची तोंड देखील बघितले जात नाही. मात्र पंढरपुर तालुक्यातील वाखरी ग्रामस्थांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला . मतदानानंतर सर्व मतभेद विसरून एकमेकांना तिळगुळ भरवून प्रचाराची कटुता संपवली. पुढच्या काळात विरोधक व सत्ताधारी एकत्र येऊन गावाचा विकास करण्याचा संकल्प केला.