जनतेज न्युज

शिवसेना स्टाईलने धडा शिकवू आमदार बालाजी कल्याणकर

प्रतिनिधी , नांदेड़ : नांदेडमध्ये जात पडताळणी कार्यालयाकडून विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी घेऊन काही विद्यार्थी आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडे आले. सांयकाळच्या सुमारास आलेल्या या विद्यार्थ्यांना घेऊन आमदार कल्याणकर यांनी जात पडताळणी गाठून कार्यालयात ठाण मांडले.  विद्यार्थ्याची अडवणूक कराल तर शिवसेना स्टाईलने तुम्हाला धडा शिकवेल असा दम आमदार कल्याणकर यांनी जात पडताळणी कार्यालयाला दिला. स्वतः आमदार विद्यार्थ्यांना घेऊन कार्यालयात आल्याचे पाहून तिथल्या अधिकाऱ्यांची अक्षरक्ष भंबेरी उडाली. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी खेटे मारणाऱ्या विद्यार्थी आणि आमदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकारी भानावर आले, त्या नंतर तातडीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. आमदारांच्या मध्यस्तीमुळे ऐन वेळेवर प्रमाणपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलय.