जनतेज न्युज

सोलापुरातील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला प्रेरणभूमीतून पेन अन् वही अर्पण करून अभिवादन…

प्रतिनिधी , सोलापूर : 6 डिसेंबर 1956 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच महापरिनिर्वाण झालं,
त्यामुळे प्रत्येकवर्षी आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादरला जातात,
मात्र ज्यांना दादरला जाणे शक्य नाही असे आंबेडकरी अनुयायी सोलापुरातील मिलिंद नगर मधील प्रेरणभूमी समजल्या जाणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करतात,
सोलापुरातील तुकाराम इंगळे आणि कार्यकर्त्यांनी 1956 ला बाबासाहेबांच्या अस्थी सोलापुरात आणल्या होत्या,
या घटनेला आज 64 वर्ष पूर्ण होत आहेत.
त्या अस्थींना आज ही सोलापुरातील प्रेरणा भूमीमध्ये विधिवत जोपासून ठेवण्यात आल आहे.
यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना एक वही एक पेन अर्पण करून अभिवादन केलं आहे.
आज दिवसभर आंबेडकरी अनुयायायी प्रेरणभूमीत येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याच चित्र पहायला मिळतं आहे.