प्रतिनिधी , जळगाव : जळगाव ॲकर:-एकनाथराव खडसे ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित वरणगाव तालुका भुसावळ या पतसंस्थेचे मध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी आहेत , परंतु या ठेवी अद्याप पर्यंत ठेवीदारांना मिळाले नसल्याने काल ठेवीदारांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन एकनाथराव खडसे यांच्यावरती आरोप केले होते त्यामुळे हा विषय जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चेचा बनला आहे एकनाथराव खडसे पतसंस्थेचे चेअरमन संदीप वाघ यांनी पतसंस्थे विषयी आज माहिती देताना म्हणाले की एकनाथराव खडसे यांचा या पतसंस्थेचे काही एक संबंध नाही एकनाथराव खडसे हे आमचे नेते आहेत या प्रेमाखातर पतसंस्थेला एकनाथराव खडसे असे नाव देण्यात आलेले आहे ठेवीदारांनी ठेवलेल्या आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर परत करणार आहोत अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन संदीप वाघ यांनी दिली आहे
