प्रतिनिधी , सोलापूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु आहेत.
यामध्ये 136 कारखान्यांचे गाळप ही सुरु झाले आहे.
मात्र जिल्ह्यातील ऊस वाहतूक करण्यासाठी वापरात येणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अक्षरशः खराब रस्त्यांमुळे पलटी होत असतानाच चित्र पहायला मिळतं आहे.
त्यामुळं ऊसाची वाहतूक करणाऱ्या ड्रॉयव्हरला स्वतःच्या जीवावर उदार होऊन दररोज मोठी कसरत करावी लागत आहे.
