प्रतिनिधी , सोलापूर मधील विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास करीत असताना गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विजापूर नाका डीबी पथकाने दोन इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर इसमांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले. यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशन डीबी पथकाने सदर आरोपींकडून सोन्याचे दागिने एक मोटरसायकल तीन टाक्या आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 57 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलीस निरीक्षक अजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, देवी पथकाचे सहायक फौजदार संजय मोरे पोलीस हवालदार राजकुमार तोळणुरे, शावरसिद्ध नरोटे श्रीरंग खांडेकर, पोलीस नाईक प्रकाश निकम पोलीस कॉन्स्टेबल इमरान जमादार शिवानंद भीमदे अतिश पाटील आलम बिराजदार उदयसिंह साळुंके विशाल बोराडे बालाजी जाधव अनिल गवसाने लखन माळी लक्ष्मण वसेकर पोलीस नाईक आयाज बागलकोठे यांनी केली आहे.
