जनतेज न्युज

स्मार्ट सिटी क्षेत्रात उद्योग, रुग्णालय, बाजारपेठ विकसित करा स्मार्ट सिटीचे मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांचा पारडी क्षेत्रात दौरा.

प्रतिनिधी , नागपूर : केन्द्र शासनाच्या गृहनिर्माण शहरी विकास मंत्रालयाचे सह सचिव आणि स्मार्ट सिटी मिशन चे डायरेक्टर श्री. कुणाल कुमार यांनी भरतवाडा, पुनापुर, पारडी, भांडेवाडी क्षेत्राचा दौरा करुन नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड च्या वतीने केले जाणारे विकास कामांची पाहणी केली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. उपस्थित होते.
नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशनच्या वतीने पूर्व नागपूर मधील मागासलेल्या भागात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत क्षेत्राधिष्ठीत विकास केल्या जात आहे. या भागामध्ये ५१ किमी लांबीचे सीमेंट रोड, पाण्याची टाकी आणि विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी गृह निर्माणचे काम हाती घेतले आहे. श्री. कुणाल कुमार यांनी विकास कामांच्या सोबत येथील जागेचा व्यवसायिक उपयोग करण्यासाठी उद्योग, रुग्णालय, महाविद्यालय, बाजारपेठ विकसित करण्याचे आवाहन केले.श्रीमती भुवनेश्वरी एस. यांनी त्यांना कळमना- पावनगाव रस्ता आणि भरतवाडा भागात केल्या जाणारे सीमेंट रोडच्या कामाबद्दल पाहणी केली.