जनतेज न्युज

हरवलेल्या बालकास मिळाले परत आई वडील,सोलापूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.

प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर शहरात पेट्रोलिंग करत असताना पत्रकार भवन येथे एक पाच वर्षांचा अज्ञात बालक पोलिसांना मिळाला,
सदर बालकाच्या पालकांची सोलापूर पोलिसांनी तात्काळ शोधाशोध सुरु केली असता,
हा बालक कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील राऊर गावचा आढळून आला,
या अल्पवयीन बालकाचं नाव शरणु राऊर असे आहे.
या बालकाच्या पालकांची ओळख पटवून सदर बालकाला सुरक्षितपणे त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सोलापूर पोलिसांनी बजावलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोलापुरातील नागरिकांमधून पोलिसांच कौतुक होत आहे.