प्रतिनिधी, कल्याण : पोलिस आणि टीसी असल्याची बतावणी करत धावत्या मेल एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना लुबाडणाऱ्या होमगार्ड व त्याच्या मित्राचा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला आहे .कल्याण जी आरपी पोलिसांनी.
होमगार्डला बेड्या ठोकल्यात तर त्याचा साथीदार पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत . विनायक त्र्यंबक ,धीरज जाधव अशी या दोघांची नावे असून विनायक त्र्यंबक हा अंबरनाथ रेल्वे स्थानकावर होमगार्ड पदावर कार्यरत होता .या दोघांची त्याच दिवशी भेट झाली पैशांची गरज असल्याने या दोघांनी ही शक्कल लढवली मात्र काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे होमगार्ड ची जेलवारी झाली . झटपट पैशांच्या हव्यासा पोटी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नाही .कल्याण जी आर पी पोलिस ठाण्यात एक असाच गुन्हा दाखल करण्यात आहे . अंबरनाथ येथे राहणारा विनायक त्र्यंबक हा रेल्वेत होमगार्ड मधून काम करत .दोन दिवसांपूर्वी त्याला त्याचा मित्र धीरज जाधव भेटला .दोघांनी पैशांसाठी एक शक्कल लढवन्याचे ठरवले .विनायक होमगार्ड असल्याने त्याचे खाकी कपड्यामुळे तो पोलिस नसल्याचा कुणाला संशय येणार नाही ,तसेच धीरज स्वतः.टीसी बनून वावरण्याचा निर्णय घेतला .या दोघांनी कल्याणहून वाराणसी कडे जाणारी एक्स्प्रेस पकडली. मेल सुरू होताच दोघांनी पोलिस आणि टीसी असल्याची बतावणी करत प्रवाशांकडे पैशांची मागणी केली .काही जणांनी पैसे दिल्यानंतर त्यांचा हुरूप वाढला .त्यांनी आणखी काही जणांना धाक दाखवत पैशांची मागणी केली .काही प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे पावती आणि ओळखपत्र मागितल मात्र हे दोघं गडबडले .प्रवाशाला संशय आल्याने त्यांनी याबाबत रेल्वे हेल्पलाईन ला फोन करत माहिती दिली .रेल्वे पोलीस कसारा येथे गाडीत शिरले .मात्र विनायक व धीरज यांनी इगतपुरी येथे उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला .मात्र कल्याण रेल्वे पोलिस पाठलाग करत या दोघांमधील विनायक याला पकडलं तर झटापटित धीरज पळून जाण्यात यशस्वी ठरला .या दोघा विरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून .फरार धिरजचा शोध पोलिस घेत आहेत .
