प्रतिनिधी, औरंगाबाद : 17 जून रोजी दुपारी 2.00 वाजता मदनपुरा येथील वंचित बहुजन आघाडीच्या ऑफीस पासून आझाद मैदान पर्यंत अमन मोर्चा निघणार आहे.विषयाचे गांभीर्य व महत्त्व लक्षात घेऊन या अमन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही आपल्याला करत आहोत. नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांचा विषय आता भारताचा अंतर्गत मामला राहिलेला नाही. हा विषय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला आहे. विविध धर्मांचे जे प्रेषित वा महात्मा आहेत जसे की मुस्लीमांचे महम्मद पैगंबर, ख्रिश्चनांचे जीझस क्राईस्ट, जैनांचे महावीर जैन, बौद्धांचे गौतम बुद्ध, हिंदूंचे प्रमुख इ. यांना मानणारे विविध धर्मांचे फॉलोअर्स जगभरात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळेच या महात्म्यांच्या मान सन्माना बद्दल परदेशातील विविध धर्मिय जनता व त्यांची सरकारे संवेदनशील आहेत. त्यामुळेच महम्मद पैगंबरां बद्दलच्या नूपूर शर्मांच्यातअपमान कारक वक्तव्या बद्दल मध्यपूर्वेतील देशांनी नाराजी व्यक्त केली व युरोपीय देशामधेही नाराजी आहे.जगातील अनेक देशात कोट्यावधी भारतीय नागरिक वास्तव्य करत आहेत. तिथे त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. कुवेतने ईशारा दिलेलाच आहे की अशी प्रतिक्रिया दिल्यास देशा बाहेर (deport) काढू शकतो. आज अंदाजे 90 लाख भारतीय गल्फमधे रहातात आणि भारताला परदेशातून येणार्या एकुण पैशापैकी (remittance) 55% गल्फ मधून येतो. 2020 मधे एकूण 578800 करोड ₹ गल्फ मधून आले. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या असंवेदनशील भूमिकांमुळे देशाला गंभीर आर्थिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. भारतीय नागरिक या प्रश्नावर भाजपच्या भूमिकेशी सहमत नाहीत. भाजपने नूपूर शर्मा व नवीन जिंदाल यांचा निलंबित केले असले तरी भाजपच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेले दिल्ली पोलिस इतर राज्यातील पोलिसांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे देशातील शांतता व सुव्यवस्थेबाबत धोक्याची परिस्थिती आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात शीख धर्मियांचा मोठा सहभाग होता. प्रदीर्घ काळ थंडी वार्यात महिला मुलांसह हाल अपेष्टा सोसणार्या आंदोलनाकार्यांशी सरकारने संवेदनाशून्य व्यवहार केला. याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी पंजाबच्या निवडणुकीत प्रचारासाठी येत असलेल्या नरेंद्र मोदींच्या मार्गावर त्यांची भेट घेऊ इच्छिणार्या शीखांच्या शिष्टमंडळास भेट नाकारून उलट हे माझ्या जीविताला धोका पोचविण्यासाठी आलेले हल्लेखोर आहेत असा कांगावा मोदींनी केला. या सर्वाचा परिणाम हा झाला की पंजाबच्या निवडणुकीत हिंदूंनीही भाजपला नाकारले व पंजाबातील जनतेने भाजपला धुवून काढले.भाजपच्या या संवेदनाशून्य भूमिका व धोरणां मुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा गैरफायदा खलिस्तान वाद्यांच्या संघटना घेत आहेत. पाकिस्तानातील ISI असेल मध्यपूर्वेतील ISISI असेल अशा इस्लामी आतंकवाद्यांशी हातमिळवणी करुन वचपा काढण्याची व भारतात दहशतवादी कारवाया करण्याची भाषा बोलत आहेत. भारतीय मुसलमान आजपर्यंत इस्लामिक दहशतवादी संघटनांना बळी पडला नाही. 99% मुसलमान भारताशी प्रामाणिक राहिला. या मुस्लीमाला आज अवमानित केल्याची भावना आहे. केंद्र शासनाला या प्रश्नावर संवेदनशील करण्या च्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने अमनमोर्चा आयोजित केला आहे. शरद पवारांचा अपमान करणाऱ्या केतकी चितळेला ताबडतोब अटक करून जी संवेदनशीलता मविआ सरकारने दाखवली ती संवेदनशीलता जामिनपात्र नसलेले वक्तव्य करणार्या नूपूर शर्मा व नवीन जिंदाल यांचा अटक करून केंद्र सरकार का दाखवत नाही हा प्रश्न आहे. या असंवेदनशील धोरणामुळे भारताबाहेर रहाणारा हिंदूही धोक्यात येऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी सेक्युलर पक्ष संघटना व व्यक्तीना आवाहन करत आहे की व्यापक जनहिताच्या भूमिकेतून अमनमोर्चा मधे सहभागी व्हावे.
