जनतेज न्युज

भाजप विरोधात पुण्यातील रस्त्यांवर राष्ट्रवादीचं भजन

प्रतिनिधी, पुणे : संत तुकाराम महाराज पादुका चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळ, ढोलकी वाजवत भजकार्यक्रम केला. रस्त्यावर बसून आणि कपाळाला काळं गंध लावून या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजप चा निषेध नोंदवला.

काल (ता. १४ जून) देहू संस्थान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मात्र पंतप्रधान यांच्या भाषणाआधी अजित पवार यांचं भाषण न घेता देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी आंमंत्रित करण्यात आलं. पवार यांना भाषणासाठी नाकारण्यात आलं. ज्यानंतर पवार काही न बोलताच बसून राहिलेत. पंतप्रधान यांनी पवार यांच्या भाषणाची आठवण मंचावर करून दिली, मात्र स्वाभिमानाखातर पवार यांनी बोलण्यास नकार दिला. याच प्रकाराचा निषेध करत आज रा. काँ. युवक कार्यकर्त्यांनी भजनाचा कार्यक्रम पुण्यात घेतला.