जनतेज न्युज

२६ जानेवारीपूर्वी अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन करा,अन्यथा ध्वजारोहन होऊ देणार नाही,बसपाचा इशारा

अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अमरावतीत वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. यामध्ये अमरावती, सातारा, अलिबाग,नंदुरबारला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, अमरावती जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयचा निधी पळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याने, ते वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीमध्ये होण्याकरिता आज बहुजन समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. २६ जानेवारीपर्यंत जर त्याचे भूमिपूजन झाले नाही. तर, महाराष्ट्रभर आंदोलन करू व मंत्री, आमदार, खासदार यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. अमरावती जिल्हा मेळघाटातील कुपोषित ग्रस्त आणि आदिवासी बहू भाग असून येथे बालमृत्यू-मातामृत्यू दर जास्त प्रमाणात आहे. कारण येथे सुसज्ज आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे इतर रुग्णांना नागपूर किंवा मुंबईला हलवावे लागते,त्यामुळे अमरावतीत वैद्यकीय महाविद्यायाची मागणी बसपाने केली आहे.