प्रतिनिधी , जळगाव : राज्यभरामध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे टोमॅटोला लागवडीपासून काढणीला ये पर्यंत बराच खर्च यावर शेतकऱ्यांच्या लागलेला असतो त्यात ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस हे नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पिकांवर रोगाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येत असतो त्याला देखील तोंड देत फवारणी करून पुन्हा उभा राहत असतो परंतु ज्या वेळेस टोमॅटो काढणीला येतो त्यावेळेस टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर हताश होत असतात कारण लागलेला खर्च निघेल की नाही या विवेचनामध्ये शेतकरी राजा हा अडकला असतो राज्यातील शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमालाला शासनाकडून जर हमीभाव मिळाला तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही परंतु राज्यातील शासन करते शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्यामुळे राज्यातील शेतकरी आज कर्जबाजारी होत असतो चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोची लागवड केलेली आहे. टोमॅटोला आतापर्यंत लाखो रुपये खर्च होऊन अजून येणाऱ्या काळात त्याचावर खर्च करावा लागेल अशी परिस्थिती आहे. परंतु आता टोमॅटो काढणीला आलेला आहे टोमॅटोला कधी शंभर रुपये कॅरेटला भाव मिळतो तर कधी पन्नास रुपये कॅरेटला भाव मिळत असल्याने लागलेला खर्च निघतो का नाही या असा प्रश्न या युवा शेतकऱ्याला पडलेला आहे. सरकारने शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे आणि कृषी विभागाचे ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा विशाल गवळी या युवा शेतकऱ्याने बोलून दाखवले.
