प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज श्री क्षेत्र जोतिबा डोंगराला भेट देऊन श्री जोतिबाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी राज्य सरकारने नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या शिंदे सरकारच्या विरोधात कोल्हापुरातील दसरा चौक येथे 13 जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा प्रसिद्ध झालेल्या संवादाची आठवण करून देत मी गुवाहाटीत नाही तर जोतिबाच्या डोंगरावर आहे असा शिंदे सरकारला टोला मारला.
