जनतेज न्युज

24 जानेवारीला ओबीसी, एनटी, व्हिजे एनटी, एसबीसी समाजाचा विशाल मोर्चा

प्रतिनिधी, जालना- २०२१ मध्ये होणाऱ्या भारताच्या जनगणनेमध्ये एससी एसटी प्रवर्गाची जनगणना होत आहे. त्याच प्रमाणे ओबीसी प्रवर्गाची ही जनगणना व्हावी, यामुळे ओबीसींची शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक स्थान व संख्याबळ किती आहे. याची नेमकी माहिती समोर येईल. त्यासोबतच राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रात प्रतिनिधित्व व सन्मान मिळेल.

संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाल्यास रोजगार व नोकरीच्या संधी वाढतील. म्हणून, 24 जानेवारी सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार आहे. शिवाजी पुतळा, पाणीवेस,मंमादेवी मंदिर, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, शनिमंदिर, उड्डाणपूल ते अंबड चौफुली पर्यंत असणार आहे.

या ऐतिहासिक मोर्चात सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी सह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी ओबीसी संघटनेकडून हाक देण्यात आली आहे. आज या मोर्चाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. राजेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने OBC बांधवांची उपस्थिती होती.