जनतेज न्युज

कुख्यात मोटार सायकल चोर आरोपी शेख अल्तमश शेख अब्दुल्ला याच्या क्रांती चौक

पोलीसांनी मुसक्या आवळून 2 लाख 15 हजार रुपयांच्या 8 मोटरसायकल जप्त केल्या आहे .

प्रतिनिधी ,औरंगाबाद: फिर्यादी विजय राधाकृष्ण पेंढारकर यांनी 2 मार्च रोजी त्यांच्या घरासमोर लावलेली प्लेझर मोपेड कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केल्या बाबत पोलीस ठाणे क्रांतीचीक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपी बाबत पोउपनि संतोष राऊत यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली असता हा गुन्हा आरोपी शेख अल्तमश शेख अब्दुल्ला याने त्याच्या साथिदारासह केला आहे आणि तो सध्या घरी आहे असे कळताच पो.उप.नि.राऊत स्टाफसह तात्काळ पडेगाव, प्रियदर्शनी कॉलनी येथे रवाना झाले घरी जाऊन आरोपी शेख अल्तमश शेख अब्दुल्ला हा घरी मिळुन आल्याने त्यास मोपेड बाबत विचारपूस करता त्याने ही मोपेड त्याचा साथीदार शेख समीर शेख मुखतार याचे सोबत औरंगपुरा येथून चोरी केल्याची कबुली देऊन ती समीरच्या घरी ठेवलेली आहे असे सांगितल्याने सदर प्लेझर मोपेड हि समीरच्या घरातुन जप्त केली तसेच त्याने औरंगाबाद शहरातुन बेगवेगळ्या टिकाणाहुन आणि जालना जिल्हयातुन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली देऊन 2 लाख 15 हजार किमतीच्या 8 मोटरसायकल काढून दिल्या आहेत.
याविषयी अधिक माहिती क्रांतीचौक पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी RNO शी बोलतांनी दिली आहे .