जनतेज न्युज

धुळे जनता कर्फ्यू ला उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलिस अधीक्षक यांच्याकडून पाहणी.

प्रतिनिधी , धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. काल संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी सहा वाजेपासून जनता कर्फ्यू ला सुरूवात करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू सुरू राहणार असून जनता कर्फ्यू दरम्यान व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकाने व आस्थापना बंद ठेवली असून या जनता कर्फ्यू ला व्यापारी महासंघातर्फे चांगला प्रतिसाद दिला जात आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय जिल्हा प्रशासन व व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला असून जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडून करण्यात आले आहे.