प्रतिनिधी , खाजगी असो की शासकीय रुग्णालय असो रुग्णालयात रुग्णांसाठी वापरण्यात आलेली इंजेक्शन व मेडिसिन हे कुठेही उघड्यावर न टाकता ती नष्ट केली पाहिजे असे शासनाचे आदेश असताना शासनाच्या या आदेशास केराची टोपली दाखवून शंकर नगर तालुका बिलोली येथे कार्यरत असलेल्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर हे वापरलेले इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकत असल्याने उघड्यावर टाकलेल्या इंजेक्शन व मेडिसिनचा अनेकांना धोका होऊ शकतो यासाठी उघड्यावर वापरण्यात आलेली इंजेक्शन व मेडिसिन टाकणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर यांनी दिली.
