प्रतिनिधी , काल वारणा – कृष्णा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून सांगली जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कनेगाव तालुका वाळवा येथे राष्ट्रीय महामार्ग वर अडकलेले आहे याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांना मिळताच त्यांनी व्हाईट आर्मी च्या टीमला सोबत घेऊन अडकलेल्या लोकांना बोटीच्या माध्यमातून बाहेर काढले व त्यांना सुरक्षित स्थळी नेऊन सोडले.
कणेगाव व भरतवाडी ही गावे महापुरामध्ये गेली अनेक वर्षेपासून बुडत आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने जमीनही ताब्यात घेतली आहे. पण अजून या गावांचे पुनर्वसन झालेले नाही. आता तरी सरकार याकडे लक्ष देणार का ?
