प्रतिनिधी , धुळे : एबीसीडी असोसिएशन ऑफ बिजनेस धुळे तर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये व्यापाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे महत्त्वाची मागणी करीत व्यापारी हा राज्याची तिजोरी भरण्यासाठी महत्त्वाचा घटक असून व्यापारी हा मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत असतो. परंतु व्यापाऱ्याला त्याच्या बदल्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा प्रशासनातर्फे मिळत नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य नियोजन करीत व्यापाऱ्यांचा विचार करावा व व्यापाराचे दुर्घटना झाल्यानंतर विमा कवच या टॅक्स मधूनच व्यापाऱ्याला दिले जावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दुकानाला आग लागणे त्याचबरोबर पुराचे पाणी शिरल्याने दुकानाचे नुकसान झाल्यास अश्या प्रकारच्या दुर्घटनेनंतर व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी विमा कवच हे टॅक्सच्या माध्यमातूनच धुळे जिल्हा प्रशासनाने व्यापार्यांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेजा यांनी केली आहे.
