जनतेज न्युज

नॅशनल हायवे क्रमांक सह बनला मृत्यूचा सापळा, दिशादर्शक फलक व सर्विस रस्ते तयार करण्याची प्रवाशांची मागणी

प्रतिनिधी , जळगाव : गेल्या दीड वर्षापासून नॅशनल हायवे क्रमांक सहा चे काम सुरू आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आहे परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये भुसावळ तालुक्यातील दिपनगर ते बोहर्डी दरम्यान पंधरा नागरिकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे दिशादर्शक किंवा सर्विस रोड व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांच्या अपघाताच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे

नॅशनल हायवे क्रमांक सहा चे काम सध्या सुरू आहे हे काम जरी अंतिम टप्प्यात आले असले तरी अद्यापही रस्त्यावरती दिशादर्शक फलक नाहीत व सर्विस रोड व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना दिशाभूल होत आहे त्यामुळे मोठमोठी अपघात घडत आहेत या अपघातांमध्ये आतापर्यंत पंधरा नागरिकांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे नॅशनल हायवे क्रमांक सहाच्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने त्वरित दिशादर्शक फलक व सर्विस रोड व्यवस्थित करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे