जनतेज न्युज

२ लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा जप्त.

प्रतिनिधी , बुलडाणा: २ लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलाय. जालन्यातील अंबड तालुक्यातील पारनेर फाटयाजवळ ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहंमद शोहेब मोहम्मद आसिफ असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाच नाव असून तो बुलडाणा जिल्हयातील चिखली शहरातील रहिवासी आहे. पारनेर फाटा येथे दोन तरुण गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती.या माहितीवरून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेऊन आरोपींकडून हा साठा जप्त केला.