जनतेज न्युज

पुरावा नसताना ही कराड पोलिसांनी लावला खुन्याचा छडा : झारखंड मधून केले अटक : जुगरच्या वादातून केला होता मित्राचा खून

प्रतिनिधी, सातारा: झारखंड येथील बांधकाम मजुराच्या खूनप्रकरणी कराड पोलिसांनी एकास झारखंड येथून अटक केली आहे कराड पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांमध्ये या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे
जुगारात पैसे जिंकले या रागातून झारखंडच्या बांधकाम मजुराचा त्याच्या सहकारी साथीदाराने 13 जुलै रोजी कराड येथील गोळेश्वर परिसरातील शेतात खून केला होता
कराड पोलिस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाच्या गुन्ह्याचा छडालावण्यात कराड पोलिसांना यश आला आहे
कोणतीही तक्रार दाखल नसताना कराड पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बांदल यांनी कराड पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे