जनतेज न्युज

हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रेरणास्थान राष्ट्रीय शाळा हिप्परग्याच्या शताब्दीवर्षानिमीत्त मिळणार जुण्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा ही हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रेरणास्थान . याच शाळेतुन स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांनी शिक्षणाचे धडे देत हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा धर्मनिर्पेक्ष लढा उभारला तर परांजपेंनी मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा उभारला . या राष्ट्रीय शाळेच्या शताब्दीवर्षानिमीत्त चळवळीच्या इतिहासाला चालना देण्यासाठी व भविष्यातील वेध घेण्यासाठी बाबासाहेब परांजपे फौंडेशनच्या पुढाकाराणे तसेच आपल घरचे प्रेरणास्थान जेष्ठ समाजवादी नेते भाई पन्नालाल सुराणा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांची भेट घेऊन विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला . हिप्परगा येथे चित्र संग्राहालयासोबतच स्मारक व जिल्ह्याच्या मुक्ती संग्रामातील इतर ठिकाणीही हेरीटेज वॉक व अॅनलाईन वेबीनारचा निर्णय घेण्यात आला .१७ सप्टेंबरपर्यंत एक पुस्तीका प्रकाशनाचाही प्रयत्न होणार असुन मराठवाड्याचा हा इतिहास पुढील पीढीला समजावा यासाठी शासनाच्या सहकार्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत .