जनतेज न्युज

वाखानरोड कराड येथील खुनाचा संवेदनशील गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड..

प्रतिनिधी , 24 सप्टेंबर रोजी कराड येथे वाखानरोड लगत असलेल्या पाणी पुरवठा ऑफिससमोर सर्जेराव पवार यांच्या भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या महिलेचा अज्ञात इसमाने घरात घुसून खून करण्यात आला होता.. याबाबतची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.. मयत महिलेचा खून तिची बहीण आणि प्रियकराने केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.. मयत महिलेने आरोपी महिलेच्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून तिचा संसार उध्वस्त केला या संशयातून मनात राग धरून महिला आणि प्रियकर या दोघांनी मिळून उज्वला ठाणेकर या 35 वर्षीय महिलेचा धारधार शस्त्राने खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले आहे..पुढील तपास कराड पोलीस करत आहेत..