जनतेज न्युज

न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा काही लोकांचा विषय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला

प्रतिनिधी, ठाणे : एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात – देवेंद्र फडणवीस

एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला श्री. देवेंद्र फडणवीस यांनी लगावला

ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच नियमावली मंजुरी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षभराचा कालावधी लागला. सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांचा विषय आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निधीतून ठाण्यात दिव्यांग स्नेही उद्यान व आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून उभारलेल्या कै. वसंतराव डावखरे प्रेक्षा गॅलरीसह विविध विकास कामे आणि ठाण्यातील भाजपा नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे श्री. फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, प्रदेश सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, कविता पाटील, नम्रता कोळी, नंदा पाटील आदींची उपस्थिती होती.