प्रतिनिधी, अमरावती : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना झालेल्या अटकेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर गर्दी जमवून कायद्याचा भंग केला आहे असा आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे,जशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते वर गुन्हे दाखल करण्यात आले त्याचप्रमाणे त्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात येण्याची मागणी भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी पोलीस महासंचालक यांंना केली आहे. काल अमरावती शहरातील राजकमल चौकात झालेल्या भाजपा आंदोलनात सहभागी झालेल्या भाजपा नेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यामुळे अनिल बोंडे हे संतप्त झाले आहेत
