जनतेज न्युज

दोन वर्षानंतर दहावीच्या परीक्षेस सुरुवात

प्रतिनिधी, सोलापूर : गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शिक्षण प्रकिया कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन सुरू होती. या दोन्ही पध्दतीने शिकलेल्या विद्यार्थ्याची व जीवनातील महत्वाच्या टप्प्यावर दिली जाणारी दहावीची ऑफलाइन परीक्षेस आजपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षक,पालक यांनी सकारात्मक प्रयत्न करून ,विद्यार्थ्यांनी ताण, तणाव, न घेता अभ्यास करून परीक्षेला उत्सहाने सामोरे जात आहेत.यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व शाळेत कोरोनाचे नियम पाळून परीक्षेस सुरुवात झाली आहे.