प्रतिनिधी, अहमदनगर : सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolhe) यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी दु:ख व्यक्त केलंय.
