प्रतिनिधी, नंदुरबार : नंदुरबार नगरपालिकेची सत्ता काँग्रेस शिवसेना आघाडी कडे असून भारतीय जनता पार्टी विरोधात आहे .नंदुरबार नगरपालिके मार्फत सुरू असलेल्या घरपट्टी वसुली वरून सत्ताधारी व विरोधक आमने सामने आले आहे . नगर पालिका प्रशासनाने घरपट्टी न भरणाऱ्या नागरिकांचे नाव नगर पालिकेच्या आवारात बॅनर लावून जाहीर केले आहे .या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले व सक्तीच्या कर वसुली च्या संदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. भाजपा तर्फे सांगण्यात आले आहे की नगर पालिकेने पहिले नाट्यमंदिर ,सी बी गार्डन ,इंदिरा मंगल कार्यालय यां इमारतीचा कर भरणा जाहीर करावा ,स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना ह्या वास्तू चालवायला देऊन त्याची थकबाकी माफ केली जाते व सामान्य जनतेचे नाव जाहीर करून सक्तीची कर वसुली नगर पालिका प्रशासन करत आहे .भाजपा हे खपवून घेणार नाही. यावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उत्तर दिले आहे. नाट्यमंदिर सीबी गार्डन इंदिरा मंगल कार्यालया नगरपालिकेच्या वास्तू असून नगरपालिकेच्या वास्तूंना नगरपालिका कधीही कर घेत नाही .भारतीय जनता पार्टी नागरिकांची दिशाभूल करत आहे की ,या संस्थेला वर्षाला करोडो रुपये उत्पन्न येते मात्र या वास्तूची मालमत्ता कर कोणत्याही स्वरूपाच्या भरला जात नाही , तर माझे विरोधकांना आवाहन आहे की त्यांनी स्वतः ह्या वास्तू चालवायला घ्याव्या व त्यांनी चालवुन दाखवाव्या. भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे घरपट्टी भरणार नाही तर शहराचा विकास होणार कसा? व नंतर हेच विरोधक आमच्यावर प्रश्न उपस्थित करतील ,विरोधकाची ही खेळी असून जनतेने यावर विश्वास ठेवू नये.असे माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलताना सांगितले.
