प्रतिनिधी, पंढरपू : संत चौखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंढरपूरात 150 दिंड्यानी एकाच वेळी संताच्या अभंगाचे गायन केले. यामध्ये सुमारे 3500 वारकारी भक्त सहभागी झाले होते. यावेळी व्यसनमुक्ती , अंधश्रध्दा निर्मुलन अशा सामजिक विषयांवर प्रबोधन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाकडून राबविण्यात आला. यासाठी वारकारी साहित्य परिषदेचे विठल पाटील यांनी सर्व वारकारी भक्तांना एकत्र केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाकडे मंगळवेढा येथील समाधीचे सुशोभिकरण करणे. आणि संत चौखामेळा यांच्या नावे प्रेरणा पुरस्कार सुरू करण्याची मागणी करण्यात आली. संत चौखामेळा हे 13व्या शतकात होऊन गेले. या काळात अनेक समतावादी विचारसरणीत संत चौखामेळा महाराज यांचे कार्य राहिले आहे. यांचाच पुण्यतिथी सोहळा पहिल्यांदाच शासनाच्या सहकार्यातून मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी वारकारी संप्रदायिक महाराज मंडळी उपस्थित होते.
