जनतेज न्युज

भारतीय दलित पॅंथर चे सिडको कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने

प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील सिडको परिसरातील सिडको कार्यालयासमोर आज भारतीय दलित पॅंथरच्या वतीने अमरण उपोषण आणि निदर्शने करण्यात आली असून भारतीय दलित पॅंथर ने सिडको प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की सिडको परिसरातील अरुण गावंडे यांच्या घरासमोरील कपिल दाखवा व समर्थ मेडिकल चे अनिल पाटील यांनी अतिक्रमण केले असून सदरील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच सिडको परिसरातील गाडीवाल्यांना टपरी मार्केट बांधून देण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी आज सिडको परिसरातील कार्यालयासमोर भारतीय दलित पँथरच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी दलित पॅंथरच्या प्रकाश पवार व दशरथ कांबळे यांनी सदरील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली असून सदरील उपोषण भारतीय दलित पॅंथरचे दिलीप पवार गिताबाई मस्के संजय सरोदे अमोल भुतकर प्रभाकर वक्ते पार्वताबाई घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आंदोलन आज रोजी करण्यात आले असून यावेळी सिडको प्रशासनाच्या विरोधात भारतीय दलित पॅंथर च्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या असून सदरील मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी माध्यमांशी बोलताना देण्यात आला आहे. सदरील आंदोलन आज रोजी संपन्न झाले आहे.