जनतेज न्युज

ऊस उत्पादक पती-पत्नीचा विषारी औषध आणून आत्महत्येचा प्रयत्न ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

प्रतिनिधी, जालना : साखर कारखाना ऊस तोडणी करायला तयार नसल्यानं आत्महत्येचा प्रयत्न,पोलिसांनी घेतलं पती-पत्नीला ताब्यात जालन्यात ऊस उत्पादक शेतकरी असलेल्या पती-पत्नीनं विषारी औषध आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडलीय.आत्महत्येचा प्रयत्न करणारे पती-पत्नी हे घनसावंगी तालुक्यातील धानोरा गावचे रहिवासी आहेत. सुभाष आप्पासाहेब सराटे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून त्यांचा 8 एकर ऊस तोडणी अभावी उभा आहे.बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या करूनही साखर कारखाना ऊस तोड करायला तयार नाहीय.त्यामुळे आलेल्या विवंचनेतून पती-पत्नीने हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच किटकनाशकाची बाटली आणून आत्महत्येचा प्रयत्न केला.या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.दरम्यान पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या करणाऱ्या पती-पत्नीला ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कीटकनाशकाची बाटली हिसकावून घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला.