जनतेज न्युज

मनसे कडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

प्रथिनिधी, वाशिम : वाशिम तालुक्यातील चिखली बु.गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्याचं काम त्वरित मंजूर करण्यात येऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने आज मनसे वाहतूक शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद बांधकाम विभागात येऊन मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान संबंधित बांधकाम अधिकारयांनी आंदोलन कर्त्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.