प्रथिनिधी, जळगाव :
हवामानाचा अचूक अंदाज सांगुन शेतकऱ्यांना जागृत करून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोणाकडुनही कसलेही मानधन न घेता अवघ्या काही मिनिटांत कोट्यवधी लोकांपर्यंत हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख हे आज कोट्यावधी शेतकऱ्यांचे हितचिंतक बनले आहेत. महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांना सोशल मीडियाद्वारे हवामान अंदाज सांगून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणारे, निसर्गाच्या संभाव्य धोक्यापासून शेतकऱ्यांना अचूक माहिती देणारे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचं शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे.
शेती आणि शेतकऱ्यांवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. शेती सोबतच त्यांचा हवामान खात्याचा खुप चांगला अभ्यास आहे. आता आपल्या देशात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे ऍनड्रॉईड फोन आला आहे. याच सोशल मिडिया माध्यमाचा वापर करीत त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचा अंदाज पोहोचला पाहिजे यासाठी वॉटसएप, फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत अवघ्या काही मिनिट पुढील प्रत्येक दिवसांचे हवामान कसे राहील याचा अंदाज कळवतात. या हवामानाच्या अंदाजामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना आपले होणारे संभाव्य नुकसान टाळता यावे हीच त्यांचघ भुमिका आहे. आणि या हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना निश्चितच उपयोग होतो. आजकाल नसर्ग हा लहरी बनला आहे आणि यांचा फटका पारंपारिक शेतीच्या पध्दतीला बसत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता निसर्गाच्या लहरीचा अंदाज घेत आपली शेती केली पाहिजे आणि शेतीतील उत्पन्न कसे वाढेल यासाठी हे मार्गदर्शन शिबिर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शन शिबिरात सहभागी झाले होते
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन डॉ निळकंठ पाटील, डॉ. विजय पाटील, यांनी केले होते. खरिप हंगामात कापूस पिकाचे उत्पादन कसे वाढवावे, खरिप हंगामात हवामान जाणून घ्यावे असे पंजाबराव डक यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक डॉ निलेश पाटील भडगाव,उत्तम थोरात शेंदुर्णी,पंजाब डख हवामान तज्ज्ञ,पाचोरा – भडगाव विधानसभा चे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील,प्रकाश बापू , नरहर पाटील, डॉ विजय पाटील, डॉ निळकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी सेंटर संचालक,कार्यक्रम नियोजन यशस्वी करते विकास लोहार सी इ ओ ,किशोर शिणकर, पी आर ओ,सूत्रसंचालन शिव व्याख्याते हर्षल पाटील यांनी केले.
